जळगाव ( प्रतीनिधी ) –जळगाव लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे पोलीस उपअधीक्षक गोपाळ ठाकूर हे ३१ में रोजी सेवानिवृत्त झाल्याने त्यांच्या जागी पोलीस उपाधीक्षक म्हणून सतीश भामरे रुजू झाले आहेत.
उप अधिक्षक सतिष भामरे यांना जळगाव जिल्ह्याची जाण असून त्यांनी बोदवड पोलिस स्टेशन, शहर वाहतुक शाखा तसेच नियंत्रण कक्ष अशा विविध ठिकाणी सेवा बजावली आहे.
सरकारी कामकाज करुन देण्यासाठी लोकसेवकाकडून कुणाला लाचेची मागणी होत असेल व त्यासंबंधी कुणाला तक्रार करायची असल्यास पोलीस उपअधीक्षक सतीष भामरे यांचा मोबाईल क्रमांक 8888834097 तसेच कार्यालय क्रं. 0257-2235477, टोल फ्री क्रं.1064 असा आहे. या क्रमांकावर तक्रारदार हे तक्रार करू शकतात .