जळगाव ( प्रतिनिधी ) ;- महवितरण मधील सहा संघटनाच्या संयुक्त कृती समितीने प्रशासनाला दिलेल्या नोटिस नुसार विविध मागण्यांसाठी सोमवारपासून पासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरु केलेले असून प्रमुख मागण्या मान्य केल्या जात नाहित तोपर्यंत लढा सुरुच राहिल असे सबाॅर्डिनेट इंजिनीअर्स असोसिएशनचे राज्य उपाध्यक्ष पराग चौधरी यांनी पदाधिका-यांना मार्गदर्शन करतांना म्हटले.
वादळ वारा असो किंवा कोव्हिडची भयावह परिस्थिती वीज कंपनीतील अधिकारी व कर्मचारी जीवाची बाजी लावून कर्तव्य बजावत आहेत. कर्तव्य बजावत असतांना 400 वीज कर्मचा-यांचा जीव गेला तरीदेखील शासनाने फ्रंटलाईन वर्कर्सचा दर्जा वीज कर्मचा-यांना दिलेला नाही. ही अत्यंत चिड येणारी बाब असल्याचे त्यांनी सांगितले.
जळगाव जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात वीज कर्मच-यांनी कार्यालयीन वेळेत काळ्या फिती लावून कार्यालयात हजर राहून सामजिक बांधिलकी जपत केवळ अत्यावश्यक सेवांचा वीज पुरवठा अखंडित चालू ठेवणे, कोविड हॉस्पिटल व त्या संदर्भातील माहिती देणे या कामाव्यतीरीक्त इतर सर्व कामे बेमुदत बंद ठेवली आहेत.
आंदोलनात सबाॅर्डिनेट इंजिनीअर्स असोसिएशनचे राज्य उपाध्यक्ष पराग चौधरी, सहसचिव कुंदन भंगाळे, सहसचिव वाय. सी. भंगाळे, सर्कल सचिव देवेंद्र भंगाळे, सुहास चौधरी, विभागीय सचिव मिलिंद इंगळे, मोहन भोई, विशाल आंधळे, विकास कोळंबे, वर्कर्स फेडरेशनचे वीरेंद्रसींग पाटील, तांत्रिक कामगार संघटनेचे आर. आर. सावकारे, कामगार महासंघाचे ज्ञाज्ञानेश्वर पाटील, चतुर सैंदाणे, विद्युत क्षेत्र तांत्रिक युनियनचे प्रदिप पाटील, रवी ठाकुर यांचेसह सर्व अधिकारी कर्मच-यांनी आंदोलनात सहभाग घेतला.
प्रमुख मागण्या:-
वीज कर्मचाऱ्यांना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा देऊन शासनाप्रमाणे सुविधा द्या.वीज कर्मचाऱ्यांचे व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे प्रथम लसीकरण करावे.कोविड 19 मुळे मृत्यू पावलेल्या वीज कर्मचाऱ्याला महाराष्ट्र शासनाप्रमाणे 50 लाख अनुदान द्यावे.तिन्ही कंपनीकरिता MDINDIA या जुन्याच TPA ची तात्काळ नेमणूक करावी.कोविड 19 आजाराचा महाराष्ट्रात उद्रेक पाहता वीज बिल वसुली करिता सक्ती करू नये.







