नवी दिल्ली (वृत्तसंस्था) ;- ऑक्सिजन तुटवड्यामुळे दिल्लीतल्या जयपूर गोल्डन हॉस्पिटलमधल्या २५ रुग्णांचा मृत्यू झालाय.
दिल्लीतल्या रोहिणी भागात असलेल्या जयपूर गोल्डन हॉस्पिटलमध्ये आता फक्त अर्धा तास पुरेल इतकाच ऑक्सिजन साठा उरलाय.
या हॉस्पिटलमध्ये २०० रुग्ण असून यापैकी ८० ऑक्सिजन सपोर्ट तर ३५ जण ICU मध्ये आहे.
काल रात्री ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्याने अतिशय अत्यवस्थ असणाऱ्या 20 रुग्णांचा मृत्यू झाला असल्याचं PTI वृत्तसंस्थेने म्हटलंय.
ऑक्सिजन पुरवठ्याची आपण वाट पाहत असून कोव्हिड 19च्या २१५ रुग्णांना याची तातडीची गरजच असल्याचं हॉस्पिटलच्या वैद्यकीय संचालकांनी म्हटलंय.
ज्या 20 जणांचा मृत्यू झाला त्यातले बहुतेकजण कोव्हिड-19चे रुग्ण होते आणि या हॉस्पिटलच्या क्रिटिकल केअर युनिटमध्ये अॅडमिट होते, असं हिंदुस्तान टाईम्सने हॉस्पिटलच्या अधिकाऱ्यांचा दाखला देत म्हटलंय.

हॉस्पिटलकडचा ऑक्सिजन साठा संपल्याने ऑक्सिजनचं प्रेशर कमी झालं आणि या सगळ्या रुग्णांचा मृत्यू झाला.







