जळगाव ( प्रतिनिधी ) ;- जिल्हाधिकारी जळगांव यांनी त्यांचे आदेश नुसार करोना विषाणू (कोव्हिड-19) चा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा, 1897 हा दिनांक 13 मार्च 2020 पासून लागू करुन खंड २,३ व ४ मधील तरतूदीच्या अंमलबजावणीसाठी अधिसुचना निर्गमीत करणेत आलेली आहे आणि त्याबाबतची नियमावली प्रसिध्द केली असून जिल्हाधिकारी हे त्यांचे कार्यक्षेत्रात कोव्हिड 19 वर नियंत्रण आण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाय योजना करणे आवश्यक असल्याने खबरदारीचा उपाय म्हणुन जळगांब जिल्हयातील सर्व हॉटेल, रेस्टॉरंट, बार, क्लब मधील बाहेरीत ]&8 लायसन्सधारक युनिट/आऊटलेटसह) इत्यादी आदरातिथ्य सेवा 50% क्षमतेसह सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत सुरु
ठेवण्याबाबत आदेशीत केलेले आहेत. सदर आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क, विभागांच्या वेग- वेगळया पथका मार्फत ठिक ठिकाणी कारवाया सुरु असुन, रात्री 9.00नंतर गस्त घालण्यात येत आहे. सदर पथकांकडुन दि.23 रोजी विहित वेळेनंतरही अनुज्ञप्त्या सुरु आढळलेल्या १) हॉटेल श्री स्टार पॅलेस, एफएल-३ , वस स्टॅणूड जवळ, जळगांव व २) हॉटेल जलपरी, एफएल-३ क्र.428, कालीका माता परिसर, जळगांब या दोन परवानाकक्ष अनुज्ञप्तीवर विभागीय गुन्हे नोंदविलेले असुन, त्यांचेवर कडक कार्यवाहीकरण्यांत येत आहे. या नंतर विहित वेळे नंतर हो अनुज्ञप्त्या सुरु राहील्यास त्यांचेवर कडक कारवाई
करण्यांत येत असुन, सदर अनुज्ञप्ती निलंबीत / रदद करण्यांची कारवाई करण्यांत येईल.







