जळगाव – डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे डीएम. कार्डियोलॉजिस्ट डॉ.वैभव पाटील यांनी शासकीय महाविद्यालयात जावून कोविड लस घेतली. लस पूर्णत: सुरक्षित असून सोशल मिडीयाच्या चर्चेतून गैरसमज न करता लसीकरण मोहिम यशस्वी करा असे आवाहन डॉ.पाटील यांनी केले.
यासंदर्भात बोलतांना बर्याच लोकांमध्ये लसीबद्दल गैरसमज निर्माण झालेले आहे. लस घेतल्यावर भयंकर त्रास होतो, लस जीवाला घातक आहे, शरिरावर साईड इफेक्ट होतात अशा निरर्थक चर्चा सोशल मिडीयाच्या माध्यमातून होत आहे. त्यावर विश्वास ठेवू नका. गैरसमज करून न घेता लसीकरण मोहीम यशस्वी करा असे आवाहन त्यांनी केले. पुढे बोलतांना त्यांनी हृदयविकार, कर्करोग, मधुमेह, उच्चरक्तदाब वा इतर आजार असलेल्या रुग्णांनी लस घेण्याआधी फॅमिली वा तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेवूनच लस घ्यावी तसेच लसीकरण झाल्यानंतर किरकोळ त्रास जाणवल्यास ताबडतोब डॉक्टरांच्या सल्याने औषधी घ्यावी असेही सांगीतले.








