जळगाव ( प्रतिनिधी ) ;- अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्याचे ट्रॅक्टर लांबविणाऱ्या चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली असून त्याच्याकडून चोरीचे ट्रॅक्टर ताब्यात घेण्यात आले आहे .

.मधुकर न्यु कोळी वय – ६७ धंदा – शेती रा.पाडळसरे ता.अमळनेर जिल्हा जळगाव यांचे मालकीचे स्वराज कंपनीचे ७४४ ट्रॅक्टर निळया रंगाचे एमएच -१९ ७06 ५४८२ हे दिनांक १५/१२/२०२० रोजी सायंकाळी ०४:०० ते दिनांक १६/१२/२०२० रोजी सकाळी ०९:३० चे दरम्यान शेतातील गोडावुन आवारातुन कोणीतरी अज्ञात चोरटयांनी एकान्तपणाचा फायदा घेवुन चोरी करुन नेले होते त्या अनुषंगाने मारवड पोलीस स्टेशन येथे भाग – ५
गुरन.९८/२०२० भादवि.क.३७९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयां बाबत पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक
चंद्रकांत गवळी जळगाव अपर पोलीस अधीक्षक सचिन गोरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेस आरोपी शोधणे कामी सुचना व मार्गदर्शन केले होते.
त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील पोहेकॉ.सुनिल दामोदरे,प्रदीप पाटील,विजय झामराव पाटील, नंदलाल पाटील,सचिन महाजन,भगवान पाटील, पंकज शिंदे यांना रवाना केले होते. स्थानिक गुन्हे शाखेकडील पोना विजय शामराव पाटील यांना बातमी मिळाली की, जळगावातील कोल्हेहिल परीसरातील एक इसम जळगाव जिल्हयात शेतक-याचे शेतातील ट्रॅक्टर चोरीचे गुन्हे करीत आहे.

त्याअनुषंगाने वरील पथकाने कोल्हे हिल परिसरात जावुन बालाजी पार्क परिसरात सदर वर्णनाप्रमाणे आरोपीतांचा शोध घेतला असता रवि सरजु राठोड वय – २६ मुळ राहणार हिरापुर ता.भगावनपुरा जिल्हा – खरगोन (मध्यप्रदेश ) हल्ली मुक्काम – बालाजी पार्क , कोल्हे हिल्स् परिसर जळगाव यास ताब्यात घेतले असता त्याने मधुकर नथ्थु कोळी वय – ६७ धंदा – शेती रा.पाडसे ता.अमळनेर जिल्हा जळगाव यांचे मालकीचे स्वराज कंपनीचे ७४४ ट्रॅक्टर निळया
रंगाचे )॥॥ – १९80 ५४८२ हे चोरी केल्याचे कबुल केले. आरोपी रवि सरजु राठोड यास ट्रॅक्टर सह ताब्यात घेवुन पुढील तपास कामी मारवड पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आलेले आहे.







