वडजी ता. भडगाव ;– 21 जून जागतिक योग दिनानिमित्त कोरोना पार्श्वभूमीवर विद्यार्थी,विद्यार्थीनी वर्ग,कर्मचारी वृंद यांनी घरीच योग प्राणायाम क्रिया प्रकार केले.कोरोनाला हरविण्यासाठी, रोगप्रतिकारशक्ति इम्युनिटी वाढविण्यासाठी तसेच श्वसन प्रणाली भक्कम करण्यासाठी प्राणायम,कपालभाती,
अनुलोम-विलोम, जलनेती करा व हसत प्रसन्न रहा.असे मुख्याद्यापक डी.डी.पाटील व नगरसेविका योजना पाटील यांनी घरीच योगदिनानिमित्त प्राणायाम प्रसंगी नमूद केले.
बना योगी ….!
रहा निरोगी….!!
यशस्वी लढा कोरोनाशी..काळजी घ्या,सुरक्षित रहा,प्रशासनास सहकार्य करा.सदर जागतिक योग दिनास संस्थेचे चेअरमन नानासाहेब प्रतापराव हरी पाटील,गट शिक्षणाधिकारी सचिन परदेशी,विस्ताराधिकारी गणेश पाटील,विस्ताराधिकारी विजय कुमावत,केंद्रप्रमुख संजय न्याहिदे,केंद्रप्रमुख रविंद्र सोनवणे यांचे मार्गदर्शन लाभले.