जळगाव (प्रतिनिधी ) ;- तालुक्यातील कुसुंबा येथे एका महिलेने विहीरीत उडी घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली असून यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. संगिता प्रकाश मोहिते (वय-३३) रा. कुसुंबा ता.जि.जळगाव असे विवाहितेची नाव आहे . घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल अग्निशामक दलाच्या विश्वजित घरडे,देविदास सुरवाडे,प्रकाश चव्हाण,रवींद्र बोरसे,भगवान जाधव,नितीन बारी यांनी विहिरीतून महिलेचा मृतदेह काढला. दीड तासानंतर महापालिकेच्या पथकाने मृतदेह बाहेर काढला. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृतदेह आणण्यात आला. शवविच्छेदन करण्यात आला असून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. मयत विवाहितेच्या पश्चात दोन भाऊ, आई, विशाल (वय-१४) व विक्की (वय-१२) ही दोन मुले असा परिवार आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील प्राथमिक तपास पो.कॉ. सध्देश्वर डापकर, होमगार्ड चेतन लाड करीत आहे.