नवी दिल्लीः- पीएनबी घोटाळ्यातील मुख्य आरोपी आणि फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीला भारतात आणण्यासाठी देशातील 8 सदस्यीय टीम डोमिनिकामध्ये तळ ठोकून आहे. ईडी, सीबीआयसह सीआरपीएफचे 2 कमांडोही या टीममध्ये हजर आहेत. मेहुल चोक्सीशी संबंधित सर्व कागदपत्रे घेऊन टीम डोमिनिकाला गेली आहे. ही टीम डोमिनिका येथे पोहोचल्यानंतर अँटिग्वाच्या पंतप्रधानांनीही खातरजमा केली, भारतीय अधिकारी खासगी विमानाने डोमिनिका येथे पोहोचले. मेहुल चोक्सीचे लवकरात लवकर प्रत्यार्पण करण्यासाठी डोमिनिका येथून भारतात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे.