चाळीसगाव ;- पीपल्स सोशल फाउंडेशन व रोटरॅक्ट क्लब ऑफ क्लासिक चाळीसगाव यांच्या संयुक्त विद्यमाने धुळे रोड लगत व मुस्लिम कब्रस्तान शेजारी असलेल्या भटकंती करणाऱ्या गरीब कुटूंबाना खिचडी वाटप करण्यात आली. यावेळी पीपल्स सोशल फाउंडेशन अध्यक्ष , रोटरॅक्ट अध्यक्ष-आकाश पोळ, मुख्यसंघटक,रोटरॅक्ट सचिव हर्षल माळी,महेंद्र कुमावत, मयूर साळुंखे,अजय पाटील, चेतन कुमावत,गौरव पाटील,रोशन चव्हाण, प्रतीक पाटील, तुषार सोनवणे, ऋतिक पाटील यांनी या दोन्ही सामाजिक संस्थाच्या माध्यमातून सुरु केला आहे. आपली सामाजिक जबाबदारी ओळखून शक्य तो पर्यंत मदत करण्याचे योजीले आहे.तरी समाजातील काही घटकांनी मदत करण्याची गरज आहे.कारण कोरोना सोबत लढतांना काही कुटुंबाना भुकमारीचा सामना देखील करावा लागतो आहे.