जळगाव ;- ७२ व्या गणतंत्रदिना निमित्त राष्ट्रिय हिंदु सुरक्षा सेना तर्फे रथ चौक जळगाव येथे भारत माता पूजन आज सकाळी 8.00 वाजता करण्यात आले. दिप प्रज्वलन करताना समाज सेवक अमोल कोल्हे व भारत मतेच्या प्रतिमेला माल्यार्पन करताना राष्ट्रीय हिंदू सुरक्षा सेना चे जिल्हाध्यक्ष मयुर बारी यांनी केले. तर रोहित ठाकरे यांनी शहिद झालेल्या जवानासाठी केशरी सिनेमातील तेरी मिट्टी मे मर जावा. हे गीत गायन करून वीर जवानांना श्रद्धांजली वाहिली.
या कार्यक्रमात रेड प्लस ब्लड बँक तर्फे आयोजित जळगाव जिल्हा पोलीस दल व कलेक्टर ऑफिसमध्ये महाराष्ट्र पत्रकार संघ येथे रक्तदान शिबिरात रक्तदान करणारे पोलीस अधिकरी, कर्मचारी व पत्रकार यांना केळी व नव वर्ष कॅलेंडर वाटप राष्ट्रीय हिंदू सुरक्षा सेना तर्फे करण्यात आले.
यावेळी उपस्थित राष्ट्रीय हिंदू सुरक्षा सेना जिल्हाध्यक्ष मयुर बारी, उपाध्यक्ष विवेक महाजन, रेड प्लस ब्लड बँक संचालक डॉ.मोईज देशपांडे,संचालक डॉ. भरत गायकवाड, समाज कार्यकर्ते प्रकाश सपकाळ आदी उपस्थित होते. तर कार्यक्रम यशस्वितेसाठी रोहित शर्मा, अमित अग्रवाल, शुभम वाघ, हरीश जगताप, निलेश वाणी, किरण शिंपी, रोहित ठाकरे यांनी कार्य केले.








