जळगाव ;- तालुक्यातील ममुराबाद येथील विवाहितेचा पैशांच्या तगाद्यासाठी छळ होत असल्याने सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून दुसऱ्या दोन वेगवेगळ्या घटनेत जळगाव शहरातील जोशींपेठ आणि गेंदालाल मिल भागात दोन तरुणींचा विनयभंग झाल्याच्या घटना घडल्या असून याप्रकरणी आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

तालुक्यातील ममुराबाद येथील माहेर आलेल्या पुजा सुरेश शिरसाठ (वय-२६) रा. बारडोली, सुरत (गुजरात) हिला माहेरहून पैसे आणावे यासाठी पती सुरेश शिरसाठ याने विवाहितेला शिवीगाळ आणि मारहाण करीत असल्याने सासरच्यांकडील हा छळ असहाय्य तालुका पोलीस ठाण्यात पतीसह सासू व सासरे यांच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक संजय भालेराव करीत आहे.
तर शहरातील गेंदालाल मिल परिसरात राहणाऱ्या १८ वर्षीय तरुणीला २१ मे रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास असरफ खान गुलशेर खान रा. गेंदालाल मिल याने अश्लिल हातवारे करून विनयभंग केला. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तरूणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जगदीश मोरे करीत आहे.
जोशी पेठ येथे राहणाऱ्या २८ वर्षीय तरूणी २१ मे रोजी रात्री २२.३० वाजता तरूणी घरासमोरील ओट्यावर बसलेली असतांना नारायण उर्फ नाऱ्या कोळी रा. बुनकर वाडा, जळगाव हा दुचाकी येऊन अश्लिल हातवारे करून तरूणीचा विनयभंग केला. याप्रकरणी तरूणीच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल कवडे करीत आहे.







