मुंबई (वृत्तसंस्था ) कल्याणमधील दूध व्यावसायिकाकडे २ कोटींची खंडणी मागणाऱ्या अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या जवळच्या साथीदारास ठाणे खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. इजाज लकडावाला असं या आरोपीचे नाव आहे. डॉन दाऊद इब्राहिमचा जवळचा साथीदार इजाज लकडावाला याला मुंबई पोलिसांनी बिहारची राजधानी पाटणा येथून जानेवारी २०२० मध्ये अटक केली होती.
२०२० साली मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने कारवाई केली त्यावेळी लकडावालाने नेपाळ मार्गे पाटणा गाठले. येथे जक्कनपूर पोलिसांच्या मदतीने मुंबई पोलिसांनी त्याला अटक होती. २० वर्षांपासून फरार लकडावाला मुंबईतील मोस्ट वॉन्टेड गुंडांपैकी एक होता आणि त्याच्यावर २५ हून अधिक गुन्हे दाखल आहेत.