जळगाव (प्रतिनिधी ) ;- मुंबई – रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांच्या सुरक्षेत कपात केल्यामुळे सुरक्षा व्यवस्था पूर्ववत करावी अशी मागणी जळगाव रिपाइं चे जिल्हा सरचिटणीस आणि आयटी सेलचे जिल्हा प्रमुख मिलिंद तायडे यांनी मेलद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे.

निवेदनात म्हटले आहे कि ,आयुक्त, राज्य राज्य गुप्तवार्ता विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचा वायरलेस मॅसेज क्र.एआयडी – व्हीएस/ऑल/जी.ओ. कॅट/२०२१- १३५ दि.८.१.२०२१ अन्वये महाराष्ट्र शासन आदेश क्र.एसएसए – १२२५/सी.एन.६१७/व्हीएस ४, दि.८/१/२०२० ची प्रसिद्ध केलेली वर्गवारी सादर केली असून.मा.अप्पर पोलीस आयुक्त, संरक्षण व सुरक्षा, मुंबई यांच्या कार्यालयातून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय खात्यांचे राज्यमंत्री मा.ना..रामदासआठवले साहेब यांची असलेली वायप्लस एसकॉर्टसह असलेली सुरक्षा कमी करून त्यांना फक्त वायप्लस सुरक्षा देण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करीत आहोत.
बहुजनांचे संघर्षनायक म्हणून अन्याय होईल तिथे सर्व प्रथम पोहचणारे. सर्व जाती धर्माच्या गरीबाना गरजूंना अन्याग्रहस्तना न्याय मिळवून देणारे, लोकनेते म्हणून मा.ना.रामदासजी आठवले लोकप्रिय नेतृत्व आहेत.त्यांची लोकप्रियता सतत वाढत असल्याकारणाने जळाऊवृत्तीच्या काही समाजकंटकांने त्यांच्या सभा दौऱ्यामध्य दहशत माजवण्याचे काही प्रकार या पूर्वी घडले आहेत. त्यांच्यावर माघील वर्षी अंबरनाथ येथे हल्याचे ही प्रयत्न झाल्याचे आठवण अझुण ताजी आहे.प्रत्येक सामाजिक राजकीय सांस्कृतिक मुद्यांवर भूमिका घेणारे, अन्याय होईल तिथे धावून जाणारे, जनतेशी थेट मिसळणारे अतिमहत्वाचे सेलिब्रेटी नेतृत्व म्हणून मा.ना.रामदासजी आठवले याना झेड सुरक्षा देणे अत्यावश्यक असताना त्यांच्या सुरक्षेत कपात करून महाविकास आघाडी सरकारने सूड उगवला आहे.
काँग्रेस राष्ट्रवादीच्या शासन काळात तत्कालीन गृहमंत्री आर.आर.पाटील यांनीही रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.रामदास आठवले यांची पोलीस सुरक्षा काढून घेतली होती.काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता लयास गेली व फडणविस यांच्या नेतृत्वात भाजप शिवसेनेची सत्ता आली त्यावेळी पुन्हा आठवले यांची पोलीस सुरक्षा पूर्ववत करण्यात आली. आज शिवसेनेच्या नेतृत्वातील काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी पुन्हा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची सुरक्षा काढून घेतली.
काँग्रेसच्या मनात रिपब्लिकन नेत्यांबद्दल कायम द्वेष राहिलेला आहे.रिपब्लिकन नेत्यांची राजकीय उंची वाढायला लागली की त्यांचे पंख छाटण्याची कुठलीही संधी हा पक्ष सोडत नाही. त्यासाठी ते सत्तेचा गैरवापर करतात.नुकत्याच झालेल्या लोकसभा आणि विधानसभेत सपाटून मार खाल्ला लाजिरवाणा पराभव पत्करला तरी काँग्रेस राष्ट्रवादीच्या अकलेत भर पडलेली दिसत नाही.
दलित, मुस्लिम शोषित वांचिंत समाजाच्या प्रश्नासाठी मा.ना.रामदासजी आठवले पायाला भिंगरी लावून अहोरात्र फिरत असतात. केंद्रातील मंत्री असताना ही राज्य सरकारने राजकीय जाणीवपूर्वक हा निर्णय सूडबुद्धीने घेतला आहे. राज्यातील राज्यमंत्र्यांना जास्त सुरक्षा व केंद्रीय राज्यमंत्र्यांना कमी सुरक्षा हे सुरक्षतेचे कोणते धोरण राज्य सरकारने व मुंबई पोलिसांनी अंगिकारले आहे हाच मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. सरकारने हा सुरक्षा साठी घेतलेला निर्णय त्वरित माघे घेऊन मा.ना.रामदासजी आठवले यांची सुरक्षा व्यवस्था पूर्ववत करावी अशी राज्यसरकरकडे मागणी करण्यात आली आहे.







