जामनेर प्रतिनिधी:- जामनेर शहरातील सम्राट अशोक नगर त्रिरत्न विहार येथे प्रजासत्ताक दिना निमित्ताने संविधान गौरव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेना, बहुजन समाज पार्टी, व वंचित बहुजन आघाडीच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. बसपा विनोद बाविस्कर, व अँड भरत पवार यांचीही या प्रसंगी आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी जेष्ठ शिवसैनीक कैलास माळी यांनी मेनबत्ती व अगरबत्ती प्रज्वलित करून बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस शिवसेना शहर प्रमुख अतुल सोनवणे व ज्ञानेश्वर जंजाळ आणि बसपा विधानसभा अध्यक्ष शक्ती सुरवाडे व वंचित आघाडीचे जि.उपाध्यक्ष नितीन रणित यांनी माल्या अर्पण केले.त्याप्रसंगी बसपाचे बि.व्ही.एफ अध्यक्ष पवन भाऊ साळवे , वंचित आघाडी चे शहर अध्यक्ष सौरभ अवचारे , कुंदन सुरवाडे,अक्षय निराले , शुभम सोनवणे, सुमित खरे, गौरव इंगळे ,साहील सुरवाडे,किरण मोरे, बळीराम भिमडे, उपस्थित होते तसेच सुत्रसंचलन किशोर तायडे यांनी केले.जामनेर शहरातील सर्व शासकीय , प्रशासकीय कार्यालये तसेच शाळा संस्था या ठिकाणी प्रजासत्ताक दिनी तिरंगा ध्वज फडकावून साजरा करण्यात आला.








