जामनेर ;- नगर परिषदेचे दत्तू तुळशीराम सावळे हे आपल्या सेवेचा कार्यकाळ पुर्ण करुण सेवानिवृत्त झाले आहेत.जामनेरची जेव्हा ग्रामपंचायत होती तेव्हा पासुन त्यांच्या सेवेला सुरुवात झाली होती.जामनेर ग्रामपंचायतचे नगर परिषदेत रुपांतर व्हावे यासाठी ही त्यांनी आ.गिरीष महाजन,माजी नगराध्यक्ष राजू बोहरा, पारस ललवाणी यांच्या सोबत कार्य पुर्ण केले.विद्यमान नगराध्यक्षा साधना महाजन यांनी ही त्यांना बऱ्याच जबाबदाऱ्या दिल्या. त्या त्यांनी चांगल्या रितीने पार पाडल्या.आदर्शवत व्यक्तिमत्व अशी त्यांची ओळख.सेवा करित असतांना त्यांनी पुढिल शिक्षण ही पुर्ण केले. जामनेर परिसरात एक चांगले व्यक्तिमत्व म्हणून परिचित आहेत. आरोग्य असो पाणी पुरवठा ,वसुली ते कोविड योद्धा अशी प्रामाणिक पणे अविरत सेवा केली. सर्व नगरपरिषद कर्मचारी यांनी त्यांचा सत्कार करून निरोप दिला. प्रास्ताविक आत्माराम शिवदे यांनी तर आभार विजय वाघ यांनी मांडले.








