ॲड. सचिन पाटील यांचे शरद पवार , अजित पवार यांना पत्राद्वारे निवेदन
जळगाव( प्रतिनिधी) ;- राष्ट्रवादी पक्षात पडत्या काळात साथ देणारे आणि प्रसंगी अंगावर पोलीस केसेस घेणाऱ्या जुन्या आणि प्रामाणिक कार्यकर्त्यांना न्याय कधी मिळणार असे साकडे ॲड. सचिन पाटील यांनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार , उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना निवेदनाद्वारे केली आहे.
यात म्हटले आहे कि , पक्षाला उतरती कळा लागली कि जसे झाडांची पाने गळून पडायला लागतात तशी नेते कार्यकतें पक्ष सोडून इतर पक्षात प्रवेश करतात.
मात्र शरद पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन कार्यरत युवकांना संधी मिळाली आहे . तशी संधी देऊन निर्णय योग्यही झाले आहेत.
जुन्या आणि प्रामाणिक कार्यकर्त्यांनी जेलभरो आंदोलने व इतर आंदोलने करून अनेक पोलिसांच्या केसेस त्यांच्या नावावर आहेत. मनपामधील झालेले सत्तांतर सर्वानी पहिले आहे. जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष अभिषेक पाटील यांची नियुक्ती करताना आम्ही देखील मुलाखत दिल्या होत्या. त्या वेळेस पक्षाने जो निर्णय घेतला तो आम्ही आमचे नेते अरुण भाई गुजराथी, गुलाबराव देवकर , सतीश पाटील , रवींद्र पाटील या नेत्यांच्या मान्यतेने मान्य केला. तसेच त्यावेळी दावेदारी देखील केली होती. परंतु आम्ही शांत बसलो. आज एका बातमीत अशोक लाडवंजारी यांना पद मिळणार अस वाचायला मिळाले . परंतु अशोक लाडवंजारी यांनी जळगाव अध्यक्षपद ,भाजपाचे विरोधी पक्ष नेतापद , विविध समित्या यावर काम केले आहे. त्यांनी आता त्यांच्या पेक्षा वयानी लहान असलेल्या व्यक्तीचे पद घेणे हे देखील योग्य होणार नाही. त्यामुळे त्यांनीच मोठ्या मनाने त्यांचे लहान भाऊ समजून आमचे नाव पुढे करून आम्हाला पक्षाचे काम करण्याची संधी द्यावी. कारण अशोक लाडवंजारी यांना एकनाथराव खडसे यांचा वरदहस्त आहे. तसा आम्हाला देखील त्यांनी देवून गरीब घरातल्या रोजगार हमी योजनेच्या कामावर काम करणाऱ्या आर आर आबांना संधी देऊन मोठे केले होते, तसे आम्हाला देखील करावे अशी विनंती करण्यात आली आहे.
शरद पवार यांनी आपल्या भाषणांमधून वेळोवेळी पक्षाच्या पडत्या काळात साथ देणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी देण्याचे म्हटले आहे.
सध्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील जळगांव जिल्हाचे प्रभारी होतें. त्यामुळे त्यांना जिल्ह्याची संपूर्ण माहिती आहे. स्वतः वळसे पाटील यांनी माझ्या सारख्या साधारण घरातील कार्य कर्त्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला होता . पणं काही तांत्रिक अडचणी मुळे मला थांबावे लागले होते. तरी माझ्या सारख्या निष्ठावान कार्यकर्त्याला संधी मिळावी अशी अपेक्षा बाळगतो असे निवेदनात ॲड. सचिन डी पाटील यांनी म्हटले आहे.