नवी दिल्ली (वृत्तसंस्था ) करोनाशी लढण्यासाठी पीएम केअर निधीमधून आतापर्यंत 3100 कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या narendramodi.in या संकेत स्थळावरून देण्यात आली आहे. पंतप्रधान कार्यालयाने ही माहिती एका ट्वीटद्वारे दिली आहे.
पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, स्थलांतरित मजुरांसाठी 1000 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. याशिवाय व्हेंटिलेटर खरेदीसाठी 2000 कोटी रुपये आणि कोरोना प्रतिबंधक लस विकसित करण्यासाठी 100 कोटी रुपये वापरले जाणार येणार आहे. या सर्व खर्चाला पीएम केअर्स फंडाच्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, करोनाशी लढा देण्यासाठी पीएम केअर फंडातून 3100 कोटी रुपयांचे वाटप करण्यात आलं आहे. यामधील 2000 कोटी रुपये व्हेंटिलेटरची खरेदी करण्यासाठी वापरले जाणार आहे. त्यातून 50 हजार व्हेंटीलेटर्स खरेदी करण्यात येणार आहेत. स्थलांतरित मजुरांची काळजी घेण्यासाठी 1000 वापरले जाणार आहे.
उर्वरित 100 कोटी रुपये कोरोना प्रतिबंधक लशीचे संशोधन, लस विकसित करणे व लशीची निर्मिती करण्यासाठी खर्च करण्यात येणार आहेत. मुख्य वैज्ञानिक सल्लागारांच्या देखरेखीखाली हा निधी खर्च होणार आहे.
पंतप्रधान पद्धसिद्ध अध्यक्ष असलेल्या या ट्रस्टची स्थापना 27 मार्च 2020 ला झाली. संरक्षणमंत्री, गृहमंत्री व अर्थमंत्री हे या ट्रस्टचे पदसिद्ध सदस्य आहेत. निधी वाटपाबाबत घोषणा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम केअर्स फंडाला उदार अंतःकरणाने मदत करणाऱ्या सर्व दानशूर देणगीदारांचे विशेष आभार मानले. त्यांच्या या देणगीमुळे कोरोना विरुद्धची लढाई सक्षमपणे लढणे शक्य होत असल्याच्या भावना पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केल्या.