पारोळा ;- जि प प्राथ शाळा धाबे ता पारोळाचे मुख्याध्यापक तथा महाराष्ट्र शासन जिल्हा व राज्य आदर्श शिक्षक मनवंतराव साळुंखे यांनी कोविड – १९ ची सुरुवात चीनच्या वुहान शहरात सुरुवात झाल्या पासुनच धाबे शाळा व गाव, शेळावे केंद्र व सर्व प्रकारच्या सोशल मिडीयाच्या माध्यमातुन या आजाराची गंभीरता, दक्षता, काळजी व होणारा प्रसार बाबत लेख, कविता व प्रत्यक्ष उपक्रमा बाबत जनजागृती व्यापक प्रमाणात सुरु केली . सर्वात प्रभावी व्हॉटस अप मिडीयावर नाविन्यपुर्ण मोबाईल मधिल इमोजींचा अनेक प्रकारे वापर करून उत्कृष्ट जागृती केली . घरोघरी जावुन या आजाराची माहिती देणे, मास्क वाटप, अन्नदानात सहभाग, रक्तदान शिबिरात सहभाग, विविध खाजगी संस्थांना या कार्यासाठी आर्थिक मदत या बरोबर मार्च ते जून अखेर पर्यंत सर्वच प्रकारचे सामाजिक, शैक्षणिक उपक्रमही सक्षमपणे पार पाडले . हे कार्य करतांना त्यांना स्वतःलाही कोरोनाचा संसर्ग झाला पण त्यावर मात करून त्यांनी आपले कार्य सुरु ठेवले . या सर्व गोष्टींचे अप्रुप वाटुन युवा कल्याण प्रतिष्ठान, अमळनेर यांनी दखल घेवुन या सेवाभावी आदर्श प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा अशोक पवार , मास्टर ट्रेनर महाराष्ट्र राज्य राज्याध्यक्ष कनिष्ठ प्राध्यापक संघटना , श्री संदीपबापू घोरपडे , सचिव अ शि प्रसारक मंडळ अमळनेर मास्टर ट्रेनर महाराष्ट्र राज्य माध्य शिक्षक , अध्यक्ष निवड समिती , बन्सीलाल भागवत, केंद्र प्रमुख अंमळगाव यांच्या मान्यवर समितीने मुख्याध्यापक साळुंखे यांच्या घरी भेट देवुन त्यांचा सत्कार अभिनंदन करून सेवाभाव सन्मापत्र प्रदान केले .
यावेळी गणेश शिंपी ,विक्रांत पाटील, श्रीकांत देसले उपस्थित होते .
मान्यवर युवा कल्याण प्रतिष्ठान , अमळनेर व पदाधिकारी यांनी प्रत्यक्ष घरी येवुन माझ्या अल्प कार्याचा सन्मान करून मला कार्य उर्जा प्रदान केली मी त्यांचा खुप आभारी व ऋणी आहे