जळगाव;- येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मागे असणाऱ्या संतोषी माता नगरातून एकाची दुचाकी अज्ञात चोरटयांनी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याकुब खान शेरखान मुल्ताणी (वय-४६) रा. संतोषी माता नगर, यांची दुचाकी क्रमांक (एमएच १९ सीए ७७३१) २६ मे रोजी सांयकाळी दुचाकीने घरी आले.२६ मे रोजी रात्री ९ ते २७ मे रोजी रात्री १ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने १७ हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरून नेल्याचे उघडकीला आले. याकुब खान यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक मिलींद सोनवणे करीत आहे.