नवी दिल्ली(वृत्तसंस्था ) राजधानी दिल्लीतील करोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. करोनाचा विळखा सोडवण्यासाठी दिल्लीत पुढील आठवडाभर लॉकडाऊन करण्यात आला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनिता केजरीवाल यांना देखील करोनाची लागण झाली आहे.
पत्नी सुनिता करोना पॉझिटिव्ह आल्यानंतर अरविंद केजरीवाल स्वत: विलगीकरणात गेले आहेत. तर त्यांच्या पत्नी सुनिता केजरीवाल देखील होम क्वारंटाईन झाल्या आहेत.