नवी दिल्ली (वृत्तसंस्था ) ;- आरबीआयने कोरोना काळात सतत सायबर गुन्हे वाढत असल्याचं सांगितलं आहे. वाढणाऱ्या सायबर क्राईमदरम्यान भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) अलर्ट जारी केला आहे.एका छोट्याशा चुकीमुळेही मोठा आर्थिक फटका बसू शकतो, त्यामुळे नेहमी काळजीपूर्वक ऑनलाईन ट्रान्झेक्शन करण्याचं आरबीआयकडून सांगण्यात आलं आहे.
आरबीआयने ट्विट करत, आपली खासगी माहिती नेहमी सुरक्षित ठेवावी. आयडेंटिटी थेफ्टपासून सावध राहण्याचं आणि नेहमी बँकिंग नियमांचं पालन करण्याचं सांगितलं आहे. सायबर स्कॅम सतत वाढत आहेत. त्यामुळे यापासून वाचण्यासाठी ग्राहकांनी आपला ओटीपी, यूपीआय पीन किंवा बँक डिटेल्स कोणत्याही व्यक्तीसोबत शेअर न करण्याचा सल्ला आरबीआयने दिला आहे. या सर्व डिटेल्सचा वापर करुन फसवणूक, फ्रॉड करणारा व्यक्ती व्हर्चुअल पेमेंट अकाऊंट (VPA) बनवून, खात्यातून पैसे काढू शकतो.
देशात प्रत्येक 10 पैकी 4 व्यक्तींसह होत असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावेळी केवळ मार्चपासून आतापर्यंत Identity theft मध्ये मोठी वाढ झालेली पाहायला मिळाली. गेल्या वर्षी नॉर्टन लाईफ लॉकद्वारा जारी करण्यात आलेल्या एका रिपोर्टनुसार, 63 टक्के लोकांना Identity theftनंतर काय करायचं याबाबत माहिती नाही. ऑनलाईन शॉपिंग करताना नेहमी विश्वासार्ह वेबसाईटवरुनच व्यवहार करावेत. सिक्योर नेटवर्कद्वारेच ट्रान्झेक्शन करावं. बँक स्टेटमेंट आणि क्रेडिट रिपोर्टकडे नेहमी लक्ष ठेवावं.