सर्वोत्तम स्त्रीरोगतज्ज्ञ संघटनेचे पारितोषिक जळगावला प्रदान
जळगाव – समाज जनजागृती व स्त्रीरोग क्षेत्रातील नवनवीन बदल स्त्रीरोग तज्ञांना सविस्तरपणे समजावून सांगणे, याशिवाय सोसायटीतर्फे विविध उपक्रम यशस्वीरित्या राबविणे, हे कार्य खरोखरच गौरवास्पद असून जळगाव स्त्रीरोग संघटनेला भावी वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा आहे, अशी प्रतिक्रिया गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांनी दिली आहे.
नाशिक येथे शुक्रवार दि. ९ जून रोजी पार पडलेल्या ३६ व्या राज्यस्तरीय अमोग्ज परिषदेतर्फे आयोजित पुरस्कार सोहळ्यात यंदाच्यावर्षी जळगाव स्त्रीरोगतज्ज्ञ संघटनेला बेस्ट सोसायटीचे पारितोषिक जाहीर झाले. सन २०२२-२०२४ या काळासाठी नियुक्त झालेल्या अध्यक्षा डॉ.सीमा पाटील आणि सचिव डॉ.दिप्ती पायघन यांच्या नेतृत्वात संघटनेने जळगाव जिल्हा स्त्रीरोगतज्ञासाठी नवनवीन मार्गदर्शनपर कार्यशाळा, व्याख्यानाचे आयोजन आणि समाज जनजागृतीसाठी राबवलेले उपक्रम यांची राज्यस्तरीय स्त्रीरोगतज्ज्ञ संघटनेने दखल घेतली. राष्ट्रीय संघटनेचे अध्यक्ष डॉ हृषीकेश पै यांच्या हस्ते बक्षीस वितरण झाले. या यशाबद्दल अध्यक्षा डॉ. सीमा पाटील आणि सचिव डॉ दिप्ती पायघन आणि टिम जॉग्स २०२२-२०२४ यांचे गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील, सचिव डॉ.वर्षा पाटील, सदस्या डॉ.केतकी पाटील, आयएमए जळगाव अध्यक्ष डॉ सुनील नाहाटा व सचिव डॉ तुषार बेंडाळे यांनी अभिनंदन केले.