पारोळा (प्रतिनिधी) – चर्मकार समाजाला शासनाने हक्काने दिलेल्या योजनांचा लाभ तळागाळातील शेवटच्या चर्मकार बांधवांपर्यंत पोहोचविण्याकामी आणि त्यांचा सर्वागीण विकास होऊन जिवनमान उंचावण्यासाठी राष्ट्रीय कार्यक्षेत्र म्हणुन संत रविदास चर्मकार युवा फाऊंडेशन मार्फत जळगांव जिल्ह्याचे जिल्ह्याध्यक्ष सुरेश पाटोळे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन पारोळा शहर अध्यक्ष म्हणुन रमेश मोरे यांची निवड करण्यात आली. निवडीबाबत संत रविदास युवा फाऊंडेशनचे स॑स्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष दत्ताभाऊ कदम या॑च्या आदेशाने आणि दिपक भाऊ ढवळे राज्य अध्यक्ष या॑च्या मार्गदर्शनाखाली तसेच रविंद्र काकडे पूर्व प्रदेशाध्यक्ष यांच्या सुचनेनुसार आणि जिल्ह्याध्यक्ष सुरेश पाटोळे यांच्या अध्यक्षतेखाली स॑त रविदास चर्मकार युवा फाऊंडेशनच्या पारोळा शहर अध्यक्ष पदी रमेश मोरे यांची नियुक्ती करण्यात आली.
नियुक्ती पत्र देतांना संत रविदास युवा फाऊंडेशनचे राज्य अध्यक्ष दिपक भाऊ ढवळे, राज्य कायदेशीर सल्लागार ऍडव्होकेट शेषराव गव्हाळे, पूर्व राज्य प्रदेशाध्यक्ष रविंद्र काकडे, जिल्ह्याध्यक्ष सुरेश पाटोळे, किरण विसावे, अरुण पाटोळे, जगदिश पाटोळे, नितेश जाधव आदीं समाज बांधव उपस्थित होते. तरी रमेश मोरे यांची पारोळा शहर अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल चर्मकार समाज बांधवांकडुन शुभेच्छा देऊन अभिनंदन करण्यात येत आहे.