पाचोरा येथे गो. से. हायस्कूलचे नाव उंचावले
पाचोरा (प्रतिनिधी) : – पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित गो.से. हायस्कूल येथे दि. ५ ऑक्टोबर रोजी स्वागत व सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. गो. से हायस्कूलची माजी विद्यार्थिनी योगिता रविंद्र चौधरी हिने एम.पी.एस. सी. या स्पर्धा परीक्षेत यश मिळवून मंत्रालयीन कनिष्ठ सहाय्यक या पदावर नियुक्ती मिळवल्याबद्दल तिचा शाळेमार्फत शालेय समिती चेअरमन खलील देशमुख व तांत्रिक विभागाचे चेअरमन वासुदेव महाजन यांच्या हस्ते स्वागत व सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविक भाषणातून खलील देशमुख यांनी मातृ व पितृछत्र हरपलेल्या योगिता हिने संघर्षमय परिस्थितीत प्राप्त केलेल्या यशाचा गौरव केला. सत्कारास उत्तर देताना योगिता चौधरी हिने शालेय जीवनात तिला शिक्षकांनी व शाळेने केलेल्या मार्गदर्शनाबद्दल व सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक एन.आर. ठाकरे, उपमुख्याध्यापक आर. एल.पाटील,पर्यवेक्षक ए.बी.अहिरे, ए. आर. गोहील, सांस्कृतिक विभाग प्रमुख एम. टी. कौंडीण्य, तांत्रिक विभाग प्रमुख एस..एन.पाटील, माजी पर्यवेक्षक शांताराम चौधरी, योगिता हिचे नातेवाईक,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एम.एन.देसले व आभार प्रदर्शन डी.डी.कुमावत यांनी केले.