ललित कला स्पर्धांमध्ये राज्यस्तरावरील प्रथम व तृतीय पारितोषिक
जळगाव — महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक अंतर्गत पार पडलेल्या ‘स्पंदन २०२५’ या राज्यस्तरीय सांस्कृतिक युवा महोत्सवात गोदावरी नर्सिंग महाविद्यालय, जळगाव येथील विद्यार्थ्यांनी लक्षणीय यश संपादन केले.
कोपरगाव येथील होमिओपॅथी वैद्यकीय महाविद्यालयात दिनांक १८ व १९ एप्रिल २०२५ रोजी या महोत्सवात विविध ललित कला व सांस्कृतिक स्पर्धांमध्ये महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. स्पर्धांमधील उल्लेखनीय कामगिरी: इन्स्टॉलेशन स्पर्धा: राज्यस्तरावर प्रथम पारितोषिक – विकास जाधव, कल्याणी शहाणे, समीक्षा जवादे, नम्रता घोरमारे बीएस्सी नर्सिंगचे विद्यार्थी) कोलाज मेकिंग: प्रथम पारितोषिक – तोशिता घुले ऑन द स्पॉट पेंटिंग: राज्यस्तरावर तृतीय पारितोषिक – निशा मंडल (पाचवा सेमिस्टर) सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या सादरीकरणातून महाविद्यालयाची ओळख राज्यस्तरावर उंचावली. विशेषतः इन्स्टॉलेशन आणि कोलाज मेकिंगमध्ये मिळालेले प्रथम पारितोषिक हे महाविद्यालयाच्या कलात्मक शिक्षणाचे प्रतीक ठरले.या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना व्यासपीठ मिळवून देणे, सांस्कृतिक जाणिवा वृद्धिंगत करणे आणि भविष्यातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी त्यांना सज्ज करणे हाच होता.या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, उपाध्यक्ष सुभाष पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, संचालक डॉ. केतकी पाटील, डॉ. वैभव पाटील आणि प्राचार्य प्रा. विशाखा गणवीर यांनी विद्यार्थ्यांचे तसेच मार्गदर्शक प्राध्यापकांचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.