डॉ. प्रवीण मुंढे ह्यांच्या कार्यतत्परतेचा नागरिकांना अनुभव
जळगाव (प्रतिनिधी) – येथील पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये गुरुवारी ८ ऑक्टोबर रोजी नूतन पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे ह्यांच्या कार्यतत्परतेचा नागरिकांना अनुभव आला. दुपारी भेटीसाठी आलेल्या नागरिकांना कक्षाबाहेर भेटून त्यांचे म्हणणे ऐकून निवेदन स्वीकारले.
नूतन पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी पत्रकार परिषद दुपारी बोलवली होती. त्यानंतर कक्षात जात असतांना बाहेर भेटीसाठी आलेल्या नागरिकांना ताटकळत असलेले पहिले त्यावेळी त्यांनी स्वतः कक्षाबाहेरच उभे राहून प्रत्येक नागरिकाजवळ जात त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. तसेच निवेदन स्वीकारून त्यांना योग्य ती माहिती दिली. यावेळी, गर्दी करू नका, अंतर ठेवा असेही यावेळी त्यांनी नागरिकांना आवाहन केले. यामुळे डॉ. मुंढे यांच्या कार्याची चुणूक नागरिकांना दिसली. तसेच नागरिकांच्या वेळेची बचतही झाली.








