जळगाव (प्रतिनिधी) – एरंडोल तालुक्यातील कासोदा येथे घराचे खोदकाम करतांना पुरातन चांदीचे शिक्के व सोन्याचे दागिने असे मिळून सुमारे १९ लाखांचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केला आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि
जळगाव जिल्हयांतील कासोदा गावातील ताराबाई गणपती समदानी यांचे कासोदा गावात असलेले जुने पडके घराचे खोदकाम चालु असतांना त्यात पुरातन शिक्के व सोन्याचे दागिने मिळाल्याबाबत पोलीस अधीक्षक डॉ.प्रविण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक, चाळीसगाव, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश चोपडे, कैलास गावडे,पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, किरणकुमार बकाले, यांना योग्य सुचना व मार्गदर्शन केल्याने किरणकुमार बकाले, पो.निरी. यांनी स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव कडील सहा. पो. निरी. जालिंदर पळे, पोउनि अमोल देवढे, सफी/ वसंत ताराचंद लिंगायत, पोहेकॉ/सुनिल पंडीत दामोदरे, पोहेकॉ/लक्ष्मण अरुण पाटील, पोना/नंदलाल दशरथ पाटील, पोना/भगवान तुकाराम पाटील, पोना/राहुल मधुकर बैसाणे, पोका/सचिन प्रकाश महाजन, चापोकों/अशोक पाटील, मुरलीधर बारी यांचे पथक तयार केले असता त्यांनी कासोदा गावात जावून वरील प्रमाणे मिळालेल्या बाबतमी प्रमाणे ताराबाई गणपती समदानी यांचे कासोदा गावातील घराचे काम करणारे १) जेसीबी चालक जितेंद्र बिरबल यादव वय ३२ मुळ रा. बरही जि. गाजीपुर (उत्तर प्रदेश) हल्ली रा. कासोदा ता.एरंडोल, २) टॅक्टर चालक ज्ञानेश्वर संतोष मराठे वय ५० रा. कासोदा ता.एरंडोल, ३) टॅक्टर चालक संजय ऊर्फ सतिष साहेबराव पाटील वय ३५ रा. कासोदा ता.एरंडोल, ४) टॅक्टर चालक राहुल राजु भिल वय २४ मुळ रा.बोरगाव ता.धरणगाव हल्ली रा.कासोदा ता.एरंडोल असे सांगितले. वरील इसमांना ताराबाई गणपती समदानी रा. कासोदा ता.एरंडोल यांना विचारपुस करता त्यांनी कळविले की, ताराबाई गणपती समदानी यांचे जुन्या पडक्या घराचे खोदकाम करीत असतांना सदर ठिकाणी पुरातन चांदीचे शिक्के व सोन्याचे दागिने मिळून आल्याचे सांगितल्याने व त्यांनी ते चांदीचे शिक्के व सोन्याचे दागिने हजर केले असता त्यात चांदीचे शिक्के हे सन १९०५ ते १९१९ कालावधीतील असून सोन्याचे दागिने सुध्दा पुरातन काळातील असल्याने ते जप्त करण्यात आले. सदर पुरातन चांदीचे शिक्के व सोन्याचे दागिने हे एकूण १९,१७,२८३/- रुपये किमंतीचे असल्याचे ज्वेलरी दुकानदारा कडून तपासणी करुन खात्री करण्यात आली आहे. सदरचे पुरातन चांदीचे शिक्के व सोन्याचे दागिने पुरातन विभाग, नाशिक येथे हस्तांतर करण्यासाठी कासोदा पो.स्टे. ला जमा करण्यात आलेले आहेत.