जळगावातून महिलेची ४० हजारांची सोनसाखळी लंपास
जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील रिंगरोड परिसरातून पायी चालणाऱ्या एका ४९ वर्षीय महिलेच्या गळ्यातून सुमारे चाळीस हजार रुपये किमतीची सोनसाखळी अज्ञात व्यक्तीने काढून नेल्याची धक्कादायक प्रकार २० रोजी सायंकाळी ८ वाजेच्या सुमारास घडली असून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि,
निशा सुरेंद्र काबरा वय ४९ व्यवसाय गृहीणी रा. सुशांत हरेशवर नगर, महेश प्रगती हॉलच्या मागे वृंदावन अपार्टमेंटच्या समोर रिंगरोड पती आणि मुलाबाळांसह वास्तव्याला आहेत.
२० रोजी ८ वाजेच्या सुमारास त्या आपले पती सुरेंद्र गणपत काबरा असे आकाशवाणी चौकात असलेल्या दत्त मंदीरातुन दर्शन घेवुन पायी घरी जांत असतांना मन्यार ग्राउंड च्या जवळ रिंगरोड वरुन जांत असतांना एक इसम अचानक आमचे पाठीमागुन मागुन येवून त्याने निशा काबरा यांच्या गळ्यात असलेले सोन्याचे मंगळसुत्र पदक असलेले असे जबरीने ओढुन सदर इसम अग्रवाल हॉस्पीटलच्या बाजुला असलेल्या झाडीत पळुन गेला. त्या घाबरल्याने जोरजोरात आरडा ओरड केलीमात्र आरोपी मिळून आला नाही. आरोपीने १५ ग्राम वजनाचे ४० हजार किमतीचे मंगळसूत्र लंपास केले. याबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पीएसआय प्रदीप चांदेलकर करीत आहे.