वैशाली जितेंद्र मुणोत (४२, रा. साने गुरुजी कॉलनी) यांनी फिर्याद दिली आहे. शुक्रवार दि. १६ फेब्रुवारी रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास साने गुरुजी कॉलनीत
वैशाली मुणोत या मुलीसह शुक्रवारी संध्याकाळी फिरायला गेल्या होत्या. तेथून घरी परतत असताना समोरून दुचाकीवर २० ते ३० वर्षे वयोगटातील दोन जण आले. त्यातील मागे बसलेल्याने डोक्यात टोपी घातलेली होती. त्याने वैशाली यांच्या गळ्यातील ४२ हजार रुपये किमतीची १४ ग्रॅम वजनाची सोनपोत ओढून नेली. त्यात तीन ग्रॅम वजनाचे सोन्याचे पँडल व ११ ग्रॅम वजनाची सोन्याची चैनचा समावेश आहे. सोनपोत ओढून नेताच महिलेने आरडाओरड केल्याने नागरिक जमा झाले. मात्र तोपर्यंत चोरटे पसार झाले होते.
या प्रकरणी वैशाली मुणोत यांनी शनिवार, १७ फेब्रुवारी रोजी रामानंद नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून दोन अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक विठ्ठल पाटील करत आहेत.