अमळनेर ( प्रतिनिधी ) अमळनेर, तालुक्यातील सोनखेडी ग्रामपंचायत ने,ग्रामपंचायत निवडणुकीनंतर आदर्श निर्माण केला आहे, या बिनविरोध सरपंच व उपसरपंच निवडीचे अमळनेर तालुक्यात, चर्चेचा विषय झाला आहे. ग्रामपंचायत मध्ये सदस्य म्हणून, सोपान देव, कौतिक भिल, सुरेखा भिल, कल्पना पाटील, भटा बाई पाटील, दिनेश मैलागिर , यांची सर्वानुमते निवड झाली, निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून, मयूर भदाने, गोकुळ लाबडे, नितीन कोचुरे, यांनी काम पाहिले, सर्व प्रक्रिया वेळी सोनखेडी येथील सर्व ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते, संजय पाटील, बंडू पाटील, प्रदीप पाटील, राजेंद्र ढमाळ, गोकुळ पाटील, दीपक पाटील, किशोर पाटील, विक्रम पाटील, नितीन पाटील,प्रमोद वाघ, यांनी सोनखेडी ग्रामस्थ. नवयुवक मित्र मंडळ यांनी सहकार्य केले.








