जालना ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील माळ सोनदेव व चितळी पुतळी येथे बुधवारी नेर – सेवली जि .प. गटातील पौर्णिमा कार्यक्रमाची सुरुवात उत्साहात करण्यात आली.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा विभागीय उपाध्यक्ष दिपक डोके, भारतीय बौद्ध महासभा जिल्हा सरचिटणीस राजेश सदावर्ते, ज्योती खरात, विकास जाधव, गुमन पारखे, भास्कर गाडेकर यांच्यासह सर्कल पदाधिकारी व कार्यकर्ते यांची प्रमुख उपस्थिती होती नेर व सेवली गटातील उपासक व उपासिका , पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.