जळगाव (प्रतिनिधी ) – 26 जानवरी रोजी झालेल्या दिल्ली येथील राजपथावरील पथसंचलनात जळगावातील नूतन मराठा महाविद्यालयाची सिनिअर अंडर ऑफिसर कु. सोनाली विकास पाटील सहभागी झाली होती व त्यात तिने पथसंचलनातील पंतप्रधान यांना गार्ड ऑफ ऑनरमध्ये सिनिअर विंग डिव्हिजन गार्ड कमांडर म्हणून नेतृत्व करण्याचा मान मिळवला तसेच संपूर्ण भारताचे एनसीसी चे प्रतिनिधित्व करण्याची तिला संधी मिळाली. जळगाव शहराला व जिल्ह्यालाही गार्ड कमांडर म्हणून प्रथम मान मिळालेला आहे. जळगावच्या या मानसन्मान मिळवून देणाऱ्या कु.सोनाली पाटील हिचा सत्कार आज जळगाव शहराच्या प्रथम नागरिक सौ.जयश्रीताई सुनील, महापौर मनपा जळगाव, आयुक्त सतीश कुलकर्णी, प्राचार्य डॉ एल पी देशमुख, लेफ्टनंट कर्नल पवनकुमार, एएनओ शिवराज पाटील व हेमाक्षी वानखेडे तसेच तिचे आई-वडील व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.