जळगाव (प्रतिनिधी) – के सी ई चे शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालय जळगावची विद्यार्थिनी सोनल वाल्मीक हटकर हीची नुकत्याच श्री.वैष्णव विद्यापीठ,विश्वविद्यालय, इंदौर (मध्य प्रदेश) येथे झालेल्या पश्चिम विभागीय अंतर विद्यापीठ बास्केटबॉल स्पर्धेसाठी कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या बास्केटबॉल संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली.
सोनल हटकर ही बास्केटबॉलची एन.आय.एस. सर्टिफाईड प्रशिक्षक, राष्ट्रीय पंच व आंतरराष्ट्रीय तांत्रिक अधिकारी परीक्षा देखील उत्तीर्ण आहे . गेल्या पाच वर्षापासून विद्यापीठाचे प्रतिनिधित्व विविध खेळात करीत आहे. सोनल हटकर च्या निवडीबद्दल जैन इरिगेशन चे चेअरमन अशोक जैन, जैन स्पोर्ट्सचे अध्यक्ष अतुल जैन, शा.शि.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक राणे, उपप्राचार्य डॉ. केतन चौधरी, विद्यापीठाचे क्रीडा संचालक डाॅ.दिनेश पाटील, विभाग प्रमुख डॉ. निलेश जोशी प्रा. प्रवीण कोल्हे प्रा.यशवंत देसले, प्रा. श्रीकृष्ण बेलोरकर प्रा. डॉ. रणजीत पाटील, फारुक शेख तसेच जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे अरविंद देशपांडे, रवींद्र धर्माधिकारी,जैन स्पोर्ट्सचे बास्केटबॉल प्रशिक्षक वाल्मिक पाटील सर्व प्रशिक्षक व खेळाडु वर्ग यांनी अभिनंदन केले.