नवी दिल्ली (वृत्तसंस्था ) – सोमालिया मध्ये मुंबईतील २६/११ दहशतवादी हल्ल्यासारखी घटना घडली आहे. या हल्ल्यात १५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दहशतवाद्यांनी सोमालियाची राजधानी मोगादिशूमधील हॉटेल हयातवर हल्ला केला आहे. हे सर्व दहशतवादी अल शबाब या संघटनेचे असल्याची माहिती समोर आली आहे. अशातच, हॉटेलमधील सर्व दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलांना यश आलं आहे. तब्बल 14 तासांनंतर ऑपरेशन संपलं आहे.
सोमालियात मुंबई झालेल्या 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याप्रमाणेच हल्ला झाला आहे. अल-शबाब या दहशतवादी संघटनेच्या बंदुकधारींनी सोमालियातील एका हॉटेलवर हल्ला केला. या घटनेत 10 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 9 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ही घटना मोगादिशूमधील आहे. जिथे बंदुकधारींनी हयात हॉटेलवर गोळीबार केला आणि दोन कारचा स्फोट केला. त्याचवेळी अल-कायद्याशी संलग्न असलेल्या अल-शबाब गटानं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.