पाचोरा (प्रतिनिधी) : – येथील पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेच्या एस एस एम एम महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर जय किरण प्रभाजी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित पाचोराद्वारा जय किरण प्रभाजी यांच्या जयंतीनिमित्ताने ॲड.सुभाषचंद संघवी खुल्या व्यायाम शाळेचे उद्घाटन व लोकार्पण झाले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आ. दिलीप वाघ होते.
व्यायामशाळेचे उद्घाटन आ.किशोर पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी उद्घाटनपर मार्गदर्शन करताना आ. किशोर पाटील म्हणाले की, एस एस एम एम महाविद्यालयाच्या या क्रीडांगणाचा मोह सर्वांनाच वाटतो. हे क्रीडांगण सर्वांसाठी खुले असल्याने संस्थेचे चेअरमन संजय वाघ यांचे त्यांनी आभार मानले. या महाविद्यालयाने देशसेवेसाठी अनेक तरुण दिलेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणातून उपस्थितांशी संवाद साधताना माजी आ. दिलीप वाघ म्हणाले की, आमची संस्था,महाविद्यालय हे सर्वांसाठी खुले आहे. ही संस्था सुदृढ माणसांबरोबर सुदृढ मने घडविण्याचे काम करत आहे याबरोबरच जयकिरण प्रभाजी नागरी पतसंस्थेच्या आर्थिक योगदानातून महिला व पुरुषांसाठी अंदाजे दहा लक्ष रुपयांच्या खुल्या व्यायामशाळा महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र उभार गेल्याने एका संस्थेने दुसऱ्या संस्थेला मदत केल्याने दोघांमधील स्नेह अधिक दृढ झाला आहे.
प्रास्ताविक पतसंस्थेचे चेअरमन अतुल संघवी यांनी केले. यावेळी संस्थेच्या माध्यमातून तरुणांना उच्च शिक्षणासाठी बिनव्याजी कर्ज देणे,मोफत मोतीबिंदू ऑपरेशन याबरोबरच वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक मदत या सर्वांचा उल्लेख प्रास्ताविकातून केला. संजय वाघ, माजी नगराध्यक्ष संजय गोहिल, माजी नगराध्यक्ष पंडित शिंदे, व्ही टी जोशी, जय किरण प्रभजी नागरी पतसंस्थेचे संचालक दीपक सांगवी, हिम्मतराव भोईटे, शिवाजी आव्हाड, अमित संघवी, सपनेश बाहेती, मॅनेजर राजेश जैन, पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे संचालक खलील देशमुख, योगेश पाटील, प्रकाश पाटील डॉ.पी एन पाटील,वासुदेव महाजन,सतीश चौधरी, जगदीश सोनार,प्रा.भागवत मालपुरे उपराचार्य प्रा.डॉ.वासुदेव वले उपप्राचार्य प्रा.जी.बी पाटील,प्रा.एस एस पाटील,प्रा.राजेश मांडोळे महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.माणिक पाटील यांनी केले तर आभार उपप्राचार्य प्रो डॉ वासुदेव वले यांनी मानले . कार्यक्रमाला पाचोरा शहरातील जेष्ठ नागरिक महिला,पुरुष खेळाडू,विद्यार्थी उपस्थित होते.