भुसावळ ( प्रतिनिधी ) – जळगाव येथील डायटचे प्राचार्य डॉ अनिल झोपे व अधिव्याख्याता डाँ. सी डी सांळुखे यांना शैक्षिक आगाज भारततर्फे स्मार्ट ऑफिसर पुरस्कार राज्य समन्वयक नाना पाटील यांनी डायटच्या कार्यालयात जाऊन प्रदान केला .

शैक्षिक आगाज भारत या राष्ट्रीय पातळीवरील संस्थेच्या शिक्षण क्षेत्रातील कामांची माहिती याप्रसंगी नाना पाटील यांनी दिली अधिव्याख्याता शैलेश पाटील यांचाही या संस्थेने गौरव केला आहे . यावेळी प्राचार्य डॉ अनिल झोपे यांनी शिक्षणात होत असलेला बदल सगळ्यांनी स्वीकारला पाहिजे आणि बदलत्या काळानुसार बदलते शिक्षण स्वरूप अंगीकारायला हवे नवी आव्हाने संधी समजून कार्य केले तर यश निश्चित मिळते , अशी भावना व्यक्त केली .
सूत्रसंचालन अधिव्याख्याता शैलेश पाटील यांनी केले अधिव्याख्याता डी बी साळुंके यांनी आभार मानले.







