महानगरपालिकेतर्फे धडक कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव शहरात विविध ठिकाणी अनेक फलक बॅनर हे कुठलीही परवाना घेता लावले जात आहे. त्यामुळे अशा फलकांवर कारवाई करण्याबाबत महसूल विभागाचे उपायुक्त यांनी थेट आदेश केले आहे. त्यानुसार मंगळवार दि. २५ जून रोजी दुपारी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महानगरपालिकेचे किरकोळ वसुली विभागातील कर्मचारी वसंत भास्कर पाटील (वय ४४, रा. संत सावता नगर, जळगाव) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार सोमवार दि. २४ जून रोजी त्यांच्यासह कर्मचारी दिगंबर पितांबर सोनवणे, ट्रॅक्टर चालक इकबाल हुसनोदिन शेख असे सिंधी कॉलनी रस्त्यावरती विनापरवाना असलेले बॅनर तपासणी करत होते. त्यावेळेला त्यांना महावितरणच्या खांबावर शितल इंग्लिश स्पिकिंग कोर्सचे छोटे बॅनर विनापरवाना लावलेले दिसून आले.
त्यामुळे फिर्यादी वसंत पाटील यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे बॅनरधारकाविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार महाराष्ट्र विदृपीकरण अधिनियमानुसार एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल लोखंडे करीत आहेत.