अमळनेर (प्रतिनिधी) – दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउटंट इंडियाच्यावतीने जुलै महिन्यात घेण्यात आलेल्या सीए फायनल परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. अमळनेर येथील पत्रकार जयंतलाल वानखेडे यांचा मुलगा व सुरत येथील श्याम बागुल यांचा भाचा हार्दिक सोनार याने सीए फायनल दोन्ही ग्रुपमधून यश संपादन केले.
देशभरातून सीए अंतिम जुन्या कोर्समधून १२ हजार ५५६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती़ त्यापैकी १३४८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले . दुसऱ्या ग्रुपसाठी १७ हजार ४४ विद्यार्थी बसले होते़ त्यापैकी २१९४ विद्यार्थी पास झाले दोन्ही ग्रुपसाठी ३९४९ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ६२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे.यंदा सीए परीक्षेत देशभरातून १.५७ टक्के विद्यार्थ्यांना यश प्राप्त झाले आहे.
हार्दिक सोनार सुरत येथे मामा श्याम बागुल यांच्याकडे शिक्षण घेत होता. हार्दिकने सीए होण्याचं स्वप्न जिद्दीने पूर्ण केलं आहे सुरत येथील नामांकित सीए रवी छावछरीया , वडील पत्रकार जयंतलाल वानखेडे, मामा श्याम बागुल यांचे मार्गदर्शन त्याला लाभले.हार्दिकचे आमदार अनिल भाईदास पाटील यांनी अभिनंदन केले त्याचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे.