पहूर, ता. जामनेर (प्रतिनिधी) – आज व्हॅलेंटाईन डेच्या दिवशीच पहूर पोलीस ठाण्यात पोलिसांच्या साक्षीने एका जोडप्याचे शुभमंगल पार पडले.
पहुर पोलीस स्टेशन हद्दीतील वडाळी येथील नवरदेव अमिन गभीर तडवी ( वय २१ ) व ढांलगांव येथील नवरी ईर्षाद जब्बार तडवी (वय २१) हे एकमेकाचे नातेवाईक आहे. त्यांचा ४ महिण्यापुर्वी साखरपुडा झाला होता. तरीसुध्दा १० फेब्रुवारी रोजी ते दोघे कोणाला न सांगता आमदाबाद येथे पळुन गेले होते. दोघाचाही नातेवाईकांनी शोध घेताला, परंतु आज दोघेही पहूर पोलीस ठाण्यात पो.नि. प्रताप इंगळे यांचे समोर हजर झाले. पो.नि. प्रताप इंगळे यांनी दोघाच्या
नातेवाईकाना पोलीस स्टेशनला बोलावुन माहीती दिली. दोघाच्या नातेवाईकाणी व नवरदेव नवरीने पहूर पोलीस ठाण्यातच लग्न करण्याचा आग्रह धरल्याने पहुर ठाण्याच्या आवारातील दत्त मंदिरात त्यांचा विवाह करण्यात आला.
यावेळी पो.नि. प्रताप इंगळे, पोउपनि संजय बनसोड, पोउपनि दिलीप पाटील, पोउपनि अमोल गर्जे,सफो. अनिल सुरवाडे, सफौ. रविद्र देशमुख, पोकॉ.ईश्वर
देशमुख, पोकॉ. गोपाल माळी, पोकॉ. संदिप पाटील, पोकॉ. राहुल जोहरे, पोकॉ विनोद पाटील, पोकॉ श्री राम धुमाळ व इतर कर्मचारी गावातील प्रतीष्ठीत नागरीक राजधर पाढरे, शाम सावळे रवि घोलप, शांताराम लाटे, गणेश पांढरे हजर होते.