खा. स्मिता वाघ यांचेसह भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील श्रीकृष्ण कॉलनी परिसरातील श्री सिध्देश्वर महादेव मंदिरात तीन दिवस शिवशक्ती यागमध्ये विविध धार्मिक अधिष्ठान करण्यात आले. यावेळी तीन दिवसात विविध मान्यवरांनी भेटी देऊन महादेवाचे दर्शन घेऊन पूजा केली. शहरातील भाविकांनी उपस्थिती देत पूजनात सहभाग घेतला.
सुरुवातीला गुरुवारी दि. २९ रोजी वेदशास्त्र संपन्न सुनील जोशी गुरुजी यांच्या अधिपत्याखाली गणपती पूजन, भद्र मंडळ स्थापना तसेच लघुरुद्र करण्यात आले. यावेळी मंत्रोच्चाराच्या घोषात भाविकांनी पूजनात सहभाग घेतला. होमजवळ पूजा जयेश व उन्नती कुलकर्णी आणि शुभम व यशस्वी राजपूत या दाम्पत्याच्या हस्ते करण्यात आली. दुसऱ्या दिवशी नवचंडी पाठ, कुंकुम अर्चन, बेल पत्र अर्चन, रुद्र याग करण्यात आले. महिला भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन नवचंडी पाठात सहभाग घेतला.
तिसऱ्या दिवशी नवचंडी याग पूर्णाहुती देण्यात आली. यावेळी सुनील जोशी गुरुजी यांच्यासह विशाल कुलकर्णी गुरुजी, अमित व्यवहारे गुरुजी, यशवंत अग्निहोत्री गुरुजी, चितामणि वैद्य गुरुजी, स्वप्नील जोशी गुरुजी, चेतन अत्रे गुरुजी, योगेश व्यवहारे गुरुजी यांनी सहकार्य केले. भाविकांचा उत्साह तिन्ही दिवशी दिसून आला. तीन दिवसात शहरातील विविध मान्यवरांनी मंदिरात धार्मिक अधिष्ठानावेळी भेट दिली. यात खा. स्मिता वाघ, माजी महापौर सीमा भोळे, माजी नगरसेवक अश्विन सोनवणे, प्रा. सचिन पाटील, दीपमाला काळे यांनीही भेट देऊन पूजा अर्चा करून सिद्धेश्वर महादेवाचे दर्शन घेतले. त्यांचे स्वागत हितेंद्र धांडे, ज्योत्स्ना धांडे केले.