जळगाव (प्रतिनिधी) :- येथील श्री संत सावता माळी युवक संघच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी रवींद्र माळी यांची निवड करण्यात आली आहे. याबाबत युवक संघाचे संस्थापक अध्यक्ष लोकनेते सचिन गुलदगड यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
रविंद्र माळी हे मूळचे धरणगाव तालुक्यातील विवरे गावचे रहिवासी असून जळगाव शहरात सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे. आगामी काळात युवकांचे संघटन करणे तसेच विविध उपक्रम राबवणे हा उद्देश असल्याचे रवींद्र माळी यांनी सांगितले. त्यांच्या निवडीबद्दल श्री संत सावता माळी युवक संघाचे राज्य सचिव सुनील गुलदगड, प्रदेशाध्यक्ष जितेंद्र महाजन, महिला प्रदेशाध्यक्ष अनुराधा गडगे, प्रदेश उपाध्यक्ष विशाल गडगे यांच्यासह जळगाव जिल्ह्यातील माळी समाज बांधवांनी त्यांच्या अभिनंदन केले आहे.