जळगाव (प्रतिनिधी) – येथील संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात बुधवारी दि. १ डिसेंबर रोजी पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचे फुलांच्या वर्षावात तसेच हार घालून स्वागत करण्यात आले. या स्वागताने विद्यार्थी भारावून गेले होते.
सकाळी विद्यालयाच्या गेटवर मुख्याध्यापिका शीतल कोळी यांनी पहिल्या विद्यार्थ्याला फुलांचा हार घालून स्वागत केले. तसेच त्यांचे औक्षण करण्यात आले. त्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्यावर शिक्षकांनी फुलांचा वर्षाव केला. यानंतर त्यांचे तापमान मोजून सेनीटायझर देण्यात आले. तसेच प्रत्येक वर्गात एका बेंचवर एक याप्रमाणे शारीरिक अंतर ठेवून विद्यार्थ्यांना अध्यापन करण्यात आले.
पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना अभ्यासाचा ताण न देता खेळीमेळीच्या वातावरणात शिकविण्यात आले. श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाच्या मुलांच्या स्वागतावेळी संस्थेचे सचिव मुकेश नाईक, उज्ज्वला नन्नवरे, साधना शिरसाट, आम्रपाली शिरसाट, उपस्थित होते.