जैन युवा रत्न पुरस्काराने नीलम बाफना, राजश्री कटारिया सन्मानित
जळगाव (प्रतिनिधी) :- येथील श्री जैन युवा फाउंडेशनचा पदग्रहण सोहळा रविवारी दि. २७ रोजी आदित्य लॉन्स येथे उत्साहात पार पडला. यावेळी जैन युवा रत्न पुरस्काराने २ जणांना गौरविण्यात आले. आगामी कार्यकाळात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यासह शिक्षण, आरोग्य आणि पर्यावरण संरक्षण यांसारख्या क्षेत्रात आम्ही अधिक प्रभावीपणे काम करण्याचा संकल्प नूतन पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
समारंभ साठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी खा. ईश्वरलाल ललवाणी, आ. राजूमामा भोळे, द्वारका जालान, नयनतारा बाफना, माजी महापौर प्रदीप रायसोनी, गोसेवक अजय ललवाणी, सुवर्ण व्यापारी सुशील बाफना उपस्थित होते. सुरुवातीला नवकार महामंत्र व गणेश वंदना सादर झाली. यानंतर मान्यवरांनी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात केली. मावळते सचिव डॉ. राहुल भन्साली यांनी मागील वर्षभराच्या कामकाजाचा आढावा मांडला.
यंदा जैन युवा रत्न पुरस्कार हे उपजिल्हाधिकारी नीलम भरत बाफना आणि जलतरणपटू राजश्री आकाश कटारिया यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात आला. दोन्ही पुरस्कारार्थींनी कृतज्ञता व्यक्त करून सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी कटिबद्ध राहू अशी ग्वाही दिली. कार्यक्रमात नूतन अध्यक्ष रितेश छोरिया, नूतन सचिव ऋषभ शाह, कोषाध्यक्ष पंकज सुराणा तसेच संचालक मंडळाच्या सदस्यांचा शपथविधी मोठ्या उत्साहात पार पडला. श्री जैन युवा फाउंडेशन मागील ७ वर्षा पासुन सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, व्यापार, सेवा अशा विविध क्षेत्रात काम करत आहे. हि परंपरा पुढेही सुरूच राहील अशी माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली.
वाचनासह दररोज माणसे जोडत चला
पुणे येथुन आलेले मुख्य वक्ता द्वारका जालान यांनी अनमोल मार्गदर्शन केले. जीवनात दररोज तुम्ही एक माणूस जोडला पाहिजे. जर हे शक्य नसेल तर एका आठवड्यात किमान एक माणूस जोडण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुम्हाला नवनवीन गोष्टी कळतात, समजतात. तुमच्या ज्ञानात भर पडते. आत्मविश्वास असायलाच हवा. आपल्या गुणांची आपल्याला पारख हवीच. वाचन करणारा व्यक्ती ज्ञानी समजला जातो. कारण दररोज त्याच्या ज्ञानात भर पडत असते, यासाठी वाचत राहा ते विचार यावेळी द्वारका जालान यांनी मांडले. सूत्रसंचालन दीपा देढिया यांनी केले. आभार ऋषभ शहा यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सचिन राका, अनीश चांदिवाल, मनोज लोढ़ा, प्रवीण पगारिया, रिकेशकुमार गांधी, दर्शन टाटिया, चंद्रशेखर राका, जयेश ललवाणी, सौरभ कोठारी, राहुल बांठिया, प्रणव मेहता,विनय गांधी, अंकित जैन, अथांग पारख, जिनेश सोगटी, आनंद चांदिवाल, पियूष संघवी, अनिल सिसोदिया, जयेश ललवाणी, दिनेश राका, अमित कोठारी, शैलेश गांधी, दिनेश बाफना,अमोल श्रीश्रीमाल, मनीष लूनिया, पारस कुचेरिया, योगेश सांखला, अमोल फूलफगर, पूर्वेश शाह, संदीप सुराणा,यतिन राका, सुशील छाजेड, तेजस जैन, गौरव पंगारिया, आशीष कांकरिया, शैलेश कटारिया, धिरज पारख, सचिन बोरा, रोहित कोचर, कुशल गांधी, भावेश जैन, रितेश छाजेड, विनोद भंडारी, नमित जैन, पी आर ओ प्रविण छाजेड़ आदींनी परिश्रम घेतले.