५० महिला आणि ३० पुरुषांची नवनाथ पारायण वाचनांने सांगता
जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील जुनी जोशी कॉलोनी येथील श्री गुरु गोरक्षनाथ मंदिरा मध्ये माघ महिन्यातील द्वितीया धर्मबीज निमित्ताने नवनाथांचे ९ दिवसीय पारायण दि २३ जानेवारी ते ३१ जानेवारी पर्यन्त वाचन सेवा रोज रात्री ८ ते १० पर्यन्त श्री स्वामी समर्थ केंद्र जानकी नगर आणि वासुदेव जोशी समाज सेवा संघ यांचे मार्फत सदर कार्यक्रमाचे आयोजन सुरु होते त्याची सांगता दि ३१ जानेवारी रोजी धर्मबीज निमित्ताने श्री गुरु गोरक्षनाथ मंदिरा मध्ये भाविकांना महाप्रसादाचे वाटप होऊन कार्यक्रमाची झाली सदर कार्यक्रमात ५० महिला आणि ३० पुरुषां नी नवनाथ पारायण वाचन आणि पठणा मध्ये सहभाग घेवून सेवा दिली कार्यक्रमात मोठ्या संख्ये ने परिसरातील नागरिक उपस्थित होते.