रावेर तालुक्यातील गारबर्डी येथे उपक्रम
चंद्रकात कोळी
रावेर (प्रतिनिधी) :- श्री चक्रधर गुरुकुल संस्कृत महाविद्यालयातील बी. ए. संस्कृत विशारद या अभ्यासक्रमात प्रवेशित विद्यार्थ्यांनी आपले सामाजिक कर्तव्य पार पाडताना गारबर्डी येथील श्रचक्रधर गड देवस्थान येथे वृक्षारोपण व स्वच्छता अभियान अत्यंत सकुशलतेने व यशस्वीरित्या पार पडले.
या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य गौरव आराध्य, प्रा. गोविंद शिंदे, प्रा. प्रियंका चंद्रवंशी, लिपिक प्रदीप पंजाबी, लोकेश तळेले, तुळशीराम महाजन व विद्यार्थी बांधव उपस्थित होते. प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून वृक्षारोपण व स्वच्छता अभियानाची माहिती दिली.