भुसावळ तालुक्यात वरणगाव येथील घटना
भुसावळ (प्रतिनिधी) :- तालुक्यातील वरणगाव शहरातील भोगावती नदीकाठी शौचासाठी गेलेल्या एका तरुणाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. वरणगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
बासीत खान रशीद खान (वय ३८, रा.धानोरा, ता. चोपडा, सध्या ह.मु. इमलीवाडा, वरणगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. मयत बासीत खान याचे पश्चात पत्नी, चार मुले, एक मुलगी असा परिवार आहे. हातमजुरी करून तो परिवाराचा उदर्निर्वाहाक करीत होता.(केसीएन)ही घटना दि.१० रोजी दुपारी १० वाजेच्या सुमारास घडली असून, बासीत खान शौचासाठी नदीकाठी गेला असता त्याचा तोल जाऊन तो पाण्यात पडला आणि बुडून मृत्यू झाला, अशी माहिती खबर देणारे शेख सईद शेख भिकारी (वय ५६, रा. इमलीवाडा, वरणगाव) यांनी दिली. या घटनेची अकस्मात मृत्यूची नोंद वरणगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. तपास सपोनि अमित कुमार बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली हेकाँ नितीन डांबरे करीत आहे. घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.