जळगाव शहरातील तांबापुरा येथील मुख्य चौकातील घटना

जळगाव (प्रतिनिधी) तांबापुरा येथील मुख्य गजबजलेला बिलाल चौकातील मदसा गल्ली येथे दुपारी ४ वाजता एका महिलेला रस्त्यात पडलेल्या विजेच्या तारांचा धक्का लागून महिलेचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी २० जुलै रोजी बकरी ईदच्या पूर्वसंध्येला घडली. त्यामुळे महावितरणच्या कारभारावर प्रश्न निर्माण झाला आहे.
जिंनतबी हुसेन शेख मणियार (वय ५०) असे मयत महिलेचे नाव आहे. मंगळवारी दुपारी ४ वाजता ती घराच्या बाहेर निघताना आकोडा टाकला असल्याने पावसामुळे तो तुटून पडला विजेचा तार तिला दिसला नाही. त्याचा धक्का तिला लागला. तत्काळ आजूबाजूच्या नागरिकांनी तत्काळ तिला शासकीय वैदयकिय महाविद्यालय व रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. रेणुका भंगाळे यांनी तपासणी केल्यानंतर महिलेस मृत घोषित केले.

रुग्णालयात महापालिकेचे विरोधी पक्षनेते तथा मेहरुणचे नगरसेवक सुनील महाजन यांनी भेट देऊन नातेवाईकांचे सांत्वन केले. मयत जिंनातबी यांच्या पश्चात मुलगा सय्यद शकील, सून, नातवंडे असा परिवार आहे. यामुळे तांबापुर परिसरात खळबळ उडाली असून महावितरणच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.







