जळगावमध्ये तरुण कुढापा चौकात उपक्रम
जळगाव ( प्रतिनिधी ) – येथील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जळगाव महानगर शाखेतर्फे २ हजार गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. शिवसेनेचे उपमहानगर प्रमुख प्रशांत सुरळकर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आला.’८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण’ या धोरणानुसार, शिवसेना नेहमीच समाजासाठी विविध उपक्रम राबवत असते. त्याचाच एक भाग म्हणून जळगावमधील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यात संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, पारोळ्याचे लोकनियुक्त नगराध्यक्ष करण पवार, जिल्हाप्रमुख कुलभूषण पाटील, महानगर प्रमुख शरद तायडे, माजी महापौर जयश्री महाजन, नितीन लढा, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्याम सोनवणे, महिला आघाडी महानगर प्रमुख गायत्री सोनवणे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संतोष चौधरी, प्रल्हाद पाटील, गौरव सोनार, मोहित पाटील, प्रकाश चौधरी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय दुसाने यांनी केले. तर प्रास्ताविक प्रशांत सुरळकर यांनी केले. उपस्थितांचे आभार उपजिल्हाप्रमुख भाऊसाहेब सोनवणे यांनी मानले.