चाळीसगाव ( प्रतिनिधी ) – चाळीसगाव तालुक्यातील १३ गावातील नागरिकांना ३ वेळा पुराचा सामना करावा लागला पुरामध्ये घरातले साहित्याचे नुकसान झाले. पूरग्रस्त नागरिकांना गॅस शेगडी आणि कपड्यांचे वाटप आमदार किशोर पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ.हर्षल माने व विष्णुदादा भंगाळे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी जगदीश पाटील ( विधानसभा क्षेत्रप्रमुख, एरंडोल) , भुराआप्पा (जि.प.सदस्य), महेंद्र पाटील (जिल्हा समन्वय व उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती , चाळीसगाव), रमेश चव्हाण ( तालुकाप्रमुख) , नानाभाऊ कुमावत (शहर प्रमुख), भिमराव खलाने (विधानसभा क्षेत्र प्रमुख), दिलीप घोरपडे ( शिवसेना प्रवक्ते), सुनील गायकवाड (तालुका संघटक), शैलेश सातपुते (उपशहर प्रमुख), धर्मा काळे ( माजी तालुकाप्रमुख ) , रघुनाथ कोळी ( एसटी कामगार सेना ) , सविता कुमावत (महिला आघाडी तालुकाप्रमुख) ,वशिमभाई चेअरमन (अल्पसंख्याक शहरप्रमुख), निलेश गायके, प्रतिभा पवार (महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख), काटेताई, सुवर्णा राजपूत, ज्योती गवळी, निर्मला मोरे, सागर पाटील (युवासेना तालुकाध्यक्ष), प्रेमदास पाटील, प्रभाकर ओगले, आरिफ मुल्ला, किशोर पिंगळे, सुरेश पाटील ( तालुका उपाध्यक्ष युवासेना) , नरेश दळवी यांच्यासह तालुक्यातील युवासेना शाखाप्रमुख, चाळीसगाव शिवसेना, महीला आघाडी व युवासेना पदाधिकारी उपस्थित होते.








